28 September Current Affairs
भारत
- बंगळुरू येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या इंटिग्रेटेड क्रायोजेनिक इंजिन मॅन्युफॅक्चरिंग सुविधेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; तसेच झोनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (दक्षिण विभाग) ची पायाभरणी
- अभिनेत्री आशा पारेख (७९) यांना २०२० चा दादासाहेब फाळके पुरस्कार
- सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती करण्याचा प्रस्ताव मांडला
- उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते जागतिक पर्यटन दिनानिमित्त 2018-19 साठी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान
- कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी रोजगार सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर केला, रोजगार तिसऱ्या तिमाहीच्या 3.14 कोटींवरून चौथ्या तिमाहीच्या 3.18 कोटींवर पोहोचला: सरकार.
- ताजमहालपासून 500 मीटरच्या आतील सर्व व्यावसायिक उपक्रम थांबवण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश.
अर्थव्यवस्था
- नवी दिल्लीत 13 वी फिक्की ग्लोबल स्किल्स समिट 2022 चे आयोजन
- स्वीडनचे साब भारतात कार्ल-गुस्ताफ एम ४ शस्त्रास्त्र प्रणालीची निर्मिती करणार
- सरकारने आयएल अँड एफएस बोर्डात फेरबदल केले; सी. एस. राजन झाले नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन
- भू-स्थानिक डेटा प्रणालीअंतर्गत संवेदनशील ठिकाणांचे मॅपिंग आणि निर्यातीवर सरकारने बंदी घातली
जागतिक घटना
- 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक पर्यटन दिन; विषय: “पर्यटनाचा पुनर्विचार”
- नासाच्या डार्ट (Double Asteroid Redirection Test) मोहिमेने अंतराळ यान यशस्वीरित्या Dimorphos या लघुग्रहावर आदळले