26 September Current Affairs
चंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव
- महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांचे नाव चंडीगड विमानतळाला देण्यात येणार असून हि घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेली आहे.
- आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील महत्त्वाचा दिवस लवकरच येत आहे.
- 28 सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी होत असते त्याच दिवशी ‘अमृत महोत्सव’चा महत्त्वाचा दिवस येत आहे. या जयंतीदिनापूर्वी या महान क्रांतिकारकाला अभिवादन म्हणून, चंडीगड विमानतळाला त्यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे.
तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर
- तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर आहे, देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळत असते.
- या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देत असतात, त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा चालू असते की त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केल्याचे सामोर आले आहे.
- मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये एवढी आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणतात, देशात देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत.
- 1974 ते 2014 सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने 113 मालमत्ता निकाली काढल्या असून मात्र, 2014 नंतर एकाही मालमत्तेची विक्री केलेली नाही.
- तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये १४ हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहे तर, 14 टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे असल्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.
सचिन पायलट होणार नवे मुख्यमंत्री
- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी काँग्रेस अध्यपदासाठी निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं असून राजस्थानमधील राजकीय घडामोडींना एक वेगळाच वेग आला आहे. बैठकीत नवा मुख्यमंत्री कोण होणार, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
- अध्यक्ष झाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार – याचा निर्णय पक्ष घेणार आहे. मात्र, गेहलोत यांच्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन पायलट की अन्य कोण-मुख्यमंत्रीपदी होणार हे पाहावे लागणार आहे.
- सचिन पायलटच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असल्याचं सांगण्यात येत असून, सी. पी. जोशी यांच्याही नावाची राजस्थानमध्ये भरपूर प्रमाणात चर्चा सुरू आहे.
- काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाची 71 वर्षीय अशोक गेहलोत यांच्या नावाला पसंती आहे.