08 October Current Affairs | 08 ऑक्टोबर चालू घडामोडी

08 October Current Affairs

भारत

  • चित्ता परिचय प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने 9-सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केली.
  • यूपीएससीने परीक्षा, भरती संबंधित माहितीसाठी मोबाइल अँप लाँच केला.
  • पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत डोनाल्ड ब्लोम यांचा पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) भेटीवर भारताचा आक्षेप
  • ऑनलाइन जुगाराचे नियमन करण्याच्या अध्यादेशाला तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी मंजुरी दिली.
  • ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही अभिनेते अरुण बाली यांचे वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत निधन
  • नोबेल शांतता पुरस्कार 2022 : युक्रेन, रशिया आणि बेलारूसमधील मानवाधिकार प्रचारकांना पुरस्कार
  • भारतीय हवाई दलाची स्थापना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी करण्यात आली असून त्याला आज ९० वर्षे पूर्ण होत आहेत.
  • आपल्या तक्रार निवारण प्रणालीची परिणामकारकता वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना १ एप्रिल २०२३ पर्यंत अंतर्गत लोकपाल (आयओ) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय रसद धोरण (एनएलपी) सुरू केले.

अर्थव्यवस्था

  • आयडीबीआय बँकेचे खासगीकरण : सरकार, एलआयसी 60.72% हिस्सा विकणार, निविदा मागवणार
  • ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा घटून 532.66 अब्ज डॉलरवर
  • डिजिटल रुपयाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आरबीआयने सेंट्रल बँक डिजिटल करन्सीवर (सीबीडीसी) संकल्पना नोट जारी केली.
  • जागतिक बँकेने नुकताच आर्थिक वर्ष 2022-2023 साठी भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला होता.
  • केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने संयुक्तपणे कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ), पंतप्रधान फोरबेल्शन ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायजेस (पीएमएफएमई) योजना आणि पंतप्रधान किसान संपदा योजना (पीएमकेएसआय) यांच्यात अभिसरण पोर्टल सुरू केले.

जागतिक घटना

  • रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कॅरोलिन बर्टोझी (अमेरिका), मॉर्टन मेल्डल (डेन्मार्क) आणि बॅरी शार्पलेस (अमेरिका) यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आले.
  • युरोपियन संसदेने युरोपियन युनियनमध्ये 2024 पर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी सिंगल चार्जिंग पोर्ट सुरू करण्याच्या नवीन नियमाला मान्यता दिली आहे.
  • जागतिक शिक्षक दिन 05 ऑक्टोबरला साजरा
  • रशियन अंतराळवीर Anna Kikina यांना इतर 3 अंतराळवीरांसह स्पेसएक्सच्या विमानाने अमेरिकेहून अंतराळात सोडण्यात आले.

Spread the love

Leave a Comment